Last Updated: Thursday, January 12, 2012, 09:15
www.24taas.com, मुंबई 
मुंबईत पोलिसांच्या विशेष पथकांनं साडे तीन हजार अवैध सिमकार्डसह एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. असीम तुर्क असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. असीमनं बनावट कागदपत्राच्या साह्यानं मोबाईलचे ३ हजार ५०० कार्ड जवळ ठेवले होते.
असीम ग्राहकांना ओळखपत्र आणि फोटो बनावट तयार करून अवैधपणे सिम कार्डची विक्री करत होता. पोलिसांना असीमकडे सर्वाच मोठ्या कंपन्यांचे सिमकार्ड होते. पोलीस आता त्याने कुणाकुणाला बनावट सीम कार्ड विकले आहेत याचा शोध घेत आहेत.
अश्या बोगस सिमकार्डचा दुरपयोग करून अनेक दहशतवादी त्यांच्या घातपाती कारवाया घडवून आणतात, त्यांमुळे या अश्या अवैधपणे सिमकार्ड विकण्यावर निर्बंध आणणे गरजेचं आहे. तसंच ह्या अश्या अवैधपणे सिमकार्डची विक्री होत असल्याने तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
First Published: Thursday, January 12, 2012, 09:15