Last Updated: Thursday, January 12, 2012, 09:30
www.24taas.com, मुंबई 
मालाडमधल्या मोहन बारवर छापा मारुन मुंबई पोलिसांनी दोन बारबालांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे सहा हजार रुपये रोकडही जप्त केली आहे. या बारमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
मात्र बार मालकाने पोलिसांचे आरोप फेटाळले आहेत. बारमध्ये कायद्यांतर्गत ऑर्केस्ट्रा आणि संगीत सुरु असल्याचं त्यानं म्हटलं आहे. यावेळी मुंबई हॉटेल ओनर्स आणि कंडक्टर असोसिएशनने या कारवाईचा विरोध करत गोंधळ घातला.
त्यांनी पोलिसांसमोर अटक करण्यात आलेल्या बारबालांचे ओळखपत्रही सादर केलं आहे. मात्र पोलिसांनी इथं देहविक्री व्यवसाय सुरु असल्याचे सांगत दोन्ही बारबालांवर गुन्हा दाखल केला आहे.
First Published: Thursday, January 12, 2012, 09:30