Last Updated: Friday, January 13, 2012, 11:37
www.24taas.com , मुंबईसीबीएसई या केंद्रीय बोर्डाच्या बारावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र, निवडणुकांमुळे बारावीच्या अंतिम परीक्षेत दोन विषयांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे, अशी घोषणा 'सीबीएसई'ने आज केली.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक ४ फेब्रुवारीऐवजी ३ मार्चपासून सुरू होईल. त्यामुळे ३ मार्च रोजी होणाऱ्या दोन विषयांच्या परीक्षा १६ एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. 'पॉलिटिकल सायन्स' आणि 'लेंडिंग ऑपरेशन्स' या विषयांच्या परीक्षा ३ मार्चला सकाळी १०.३० वाजता होणार होत्या.
आता दोन्ही विषयांचे पेपर संपूर्ण परीक्षा संपल्यानंतर १६ एप्रिल रोजी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे १३एप्रिलला संपणारी ही परीक्षा नव्या वेळापत्रकाप्रमाणे १६ एप्रिलला संपेल, 'सीबीएसई'ने स्पष्ट केले आहे.
First Published: Friday, January 13, 2012, 11:37