एमएमआरडीएचा सायकल ट्रॅक... कशासाठी ? - Marathi News 24taas.com

एमएमआरडीएचा सायकल ट्रॅक... कशासाठी ?

पंकज दळवी, www.24taas.com, मुंबई
 
 
एमएमआरडीएनं मोठा गाजावाजा करून मुंबईतल्या बीकेसीमध्ये सायकल ट्रॅक बनवला होता, मुख्यमंत्र्यांनी सायकल चालवून या ट्रॅकचं उद्घाटन केलं होतं. मात्र या सायकरस्वारीनंतर या ट्रॅकवरून फारशा सायकल धावल्याच नाहीत. हा ट्रॅक बांधण्यापूर्वी कुठलाही सर्व्हे केला नव्हता हे एमएमआरडीनं  मान्य केलं आहे. त्यामुळे सायकल ट्रॅकच्या आवश्यकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
 
साडेसहा कोटी रुपये खर्चुन बांधण्य़ात आलेल्या या सायकल ट्रॅकवर एकही सायकल धावलेली नाही. एमएमआरडीएनं मोठा गाजावाजा करीत हा ट्रॅक बांधला. मात्र त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याचं उघ़ड झालं आहे. ट्रॅक बनवताना त्याचं सर्वेक्षणच केलं नसल्यानं ही योजनाच फसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी सायकल चालवून या ट्रॅकचं उद्घाटन केलं त्यांच्या सायकरस्वारीनंतर या ट्रॅकवरून सायकल धावल्याच नाहीत. तरीही केवळ सहा महिन्यांत या ट्रॅकची अवस्था खराब झाली आहे. एमएमआरीडीएच्या या चुकीच्या कामाची जबाबदारी घ्यायला मात्र  कोणीच पुढे येण्यास तयार नाही.

First Published: Saturday, January 14, 2012, 20:50


comments powered by Disqus