Last Updated: Saturday, January 14, 2012, 21:46
www.24taas.com, मुंबई मनपा निवडणुकीत मुंबईत भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात येणार नाही. मुंबईत भाजप नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपात रोज नाराजांची संख्या वाढतच आहे. त्यातच महायुतीतल्या जागा वाटपानं कार्यकर्ते नाराज आहे. दोन ते तीन ठिकाणी जागा शिवसेनेला सोडल्यानं कार्यकर्त्यांनी ऑफिसची तोडफोड केली. त्यातच अनेकांनी आपल्या नातेवाईकांना उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.
त्यामुळं कार्यकर्त्यांच्या नाराजीत जर एखाद्या नेत्याच्या घरात तिकीट दिलं तर मोठी बंडाळी होण्याच्या भीतीनं भाजपनं आता घरात तिकीट देण्यावरून सावध भूमिका घेतली आहे.
First Published: Saturday, January 14, 2012, 21:46