Last Updated: Saturday, October 22, 2011, 10:41
झी २४ तास वेब टीम, मुंबई बिग बॉस हा रियालिटी शो नेहमीच वादाच्या भोव-यात सापडत आला आहे, पण आता या शोमध्ये असणाऱ्या नोकराच्या मराठी नावावर मनसेचा आक्षेप आहे, लेखी माफी न मागितल्यास कारवाईचा गर्भित इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

नेहमीच वादाची किनार घेऊन येणा-या बिग भॉस या रियालिटी शोनं आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. बिग बॉसमध्ये कलाकारांना देण्यात आलेल्या टास्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्षेप घेतला आहे. या टास्कमध्ये नोकराचं आडनाव ‘लेले’ असं ठेवण्यात आलं आहे.
लेले हे आडनाव मराठी असून त्यातील पात्राला हीन वागणूक दिली जात आहे. या आडनावाला राज ठाकरेंनी आक्षेप घेतला आहे. संबधित निर्मात्यांनी या प्रकरणात माफी मागावी अशी मागणी मनसेनं केली आहे. माफी न मागितल्यास मनसे योग्य वेळी य़ोग्य ती कारवाई करेल असा गर्भित इशाराही राज ठाकरेंनी दिलाय. नोकरांची आडनावं किंवा नावं फक्त मराठी पार्श्वभूमीची असतात का असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
First Published: Saturday, October 22, 2011, 10:41