Last Updated: Wednesday, January 18, 2012, 07:57
www.24taas.com, मुंबई
मुंबईत ग्रँट रोड परिसरात मध्यरात्री मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेनं लोटस बारवर छापा टाकून १५ मुलींना ताब्यात घेतलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र पोलिसांनी छापा टाकताच दरवाजाबाहेर उभा असलेला एक गार्ड एक बटन दाबून बारमध्ये सिग्नल देत होता. त्यामुळे आतमध्ये पोलीस आल्याचा सिग्नल मिळत असे. आणि मुलींना गायब केलं जात होतं.
मात्र यावेळी पोलिसांनी दोन नकली ग्राहकांना आत पाठवून बारवर छापा मारला आणि मुलींना पकडण्यात आलं. पकडलेल्या दोन मुलींपैकी दोघी जणी अल्पवयीन असण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
First Published: Wednesday, January 18, 2012, 07:57