Last Updated: Thursday, January 19, 2012, 23:51
www.24taas.com, मुंबई 
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस परत करावा लागणार आहे. महापालिकेच्य २८,००० कर्मचाऱ्यांना तीन आठवड्यात ७५०० रुपयांची रक्कम परत करावी लागणार आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फटका बसला आहे.
मुंबई महापालिकेच्या संपकरी कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस परत करावा लागणार आहे. महापालिकेच्या सुमारे 28 हजार कर्मचा-यांना प्रत्येकी 7500 रुपये महापालिकेला परत करावे लागणार आहेत. सुप्रीम कोर्टानं संपकरी कर्मचा-यांची याचिका फेटाळल्यानं तीन आठवड्यांत ही रक्कम त्यांना परत करावी लागेल.
शरद राव यांच्या संघटनेनं वेतनवाढीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांना बोनस देणार नसल्याची भूमिका आयुक्तांनी घेतली होती. मात्र संपकरी कर्मचा-यांनी याविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती, त्यावेळी दिवाळीच्या तोंडावर 11 हजार बोनसच्या रकमेपैकी 7500 रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. तसचं हे प्रकरण औद्योगिक न्यायालयातही सुरु आहे.
त्यानंतर मुंबई मनपाने हे प्रकरण ओद्योगिक न्यालयात सुरु असल्याचं सांगत, त्याचा निकाल लागेपर्यंत पैसे परत करण्याचा युक्तीवाद हायकोर्टात केला होता. त्यानंतर हायकोर्टानं यापूर्वीच हे पैसे परत करावे, असे आदेश दिले होते. त्याविरोधात म्युनसिपल मजदूर युनियननं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानंही औद्योगिक न्यायालयात हे प्रकरण असल्याचं सांगत, संपकरी कर्मचा-यांची याचिका फेटाळली.
First Published: Thursday, January 19, 2012, 23:51