मालाड to मरीन ड्राईव्ह सागरीमार्ग - Marathi News 24taas.com

मालाड to मरीन ड्राईव्ह सागरीमार्ग

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
मालाड ते मरीन ड्राईव्हपर्यंत (सागरीकिनारा रस्ता) कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे सहा हजार रुपये कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी दिली.
सागरीकिनारा रस्ता हा सुमारे ३२ किमी लांबीचा असून त्यासाठी महापालिका आयुक्त सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. कोस्टल रोड हा विकासाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. दक्षिण मुंबईपासून पश्चिम उपनगरांना जोडणारी वाहतूक गतीमान होणार आहे. रस्त्यामुळे किनारपट्टीवरील कोळी बांधवांना अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.
 
रस्ता उभारण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. नरीमन पॉईंट येथील एअरइंडिया इमारतीपासून सुरू होणारा रस्ता मालाड येथील मार्वेपर्यंत पहिल्या टप्प्यात बांधला जाणार आहे. या रस्त्याचा विस्तार विरापर्यंत केला जाणार आहे. याकरिता वाहतूककोंडी तसेच रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येचा व इतर बाबींचा अभ्यास पालिकेच्या अभियंत्यांकडून सुरु आहे, अशी माहिती यावेळी सुबोध कुमार यांनी दिली.
 

First Published: Wednesday, October 26, 2011, 05:03


comments powered by Disqus