रेल्वे आरक्षण आज बंद - Marathi News 24taas.com

रेल्वे आरक्षण आज बंद

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
दिवाळीनिमित्त मुंबईसह राज्यभरातील रेल्वेची संगणकीकृत आरक्षण केंद्रे आज बुधवारी दुपारी दोन वाजल्यानंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठराविक ठिकाणी काही मोजक्या खिडक्या सुरू राहणार असल्याचे रेल्वेने कळविले आहे.
पॅसेंजर रिझव्‍‌र्हेशन सिस्टिम किंवा ‘पीआरएस’ म्हणून ओळखली जाणारी ही केंद्रे आज दुपारी दोन ते रात्री आठ या काळात बंद राहणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे

First Published: Wednesday, October 26, 2011, 04:32


comments powered by Disqus