Last Updated: Friday, January 27, 2012, 23:34
www.24taas.com, मुंबई १२ वर्षांचा मुलाचं अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. २३ जानेवारीला ‘एरेक फर्नांडिस’ या शाळकरी मुलाचं अपहरण अगदी फिल्मी स्टाईलमध्ये करण्यात आलं होतं. पण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मुलगा सुखरुप घरी पोहचला आणि आरोपी सुद्धा गजाआड झाले.
‘सिंघम’सारखं फिल्मी स्टाईलनं ४ अपहरणकर्त्यांनी १२ वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं होतं. एरेक फर्नांडिस २३ तारखेला शाळेत जात असताना आरोपींनी त्याचं अपहरण केलं. अपहरणानंतर आरोपींनी एरेकच्या वडिलांकडून पाच कोटी रुपयाचा खंडणी मागितली.पाच कोटी देण्याची ऐपत नसल्याचं एरेकच्या वडिलांनी सांगितल्यानंतर अपहरणकर्ते शेवटी पाच लाख रुपये घ्यायला तयार झाले. वडिलांना सह्याद्री एक्सप्रेसमध्ये पैसे घेऊन यायला सांगितलं. दुसऱ्या वेळी पुन्हा फोन करून एरेकच्या वडिलांना कल्याणजवळ यायला सांगितलं. पण एरेकचे वडील पैसे घेऊन आले तेव्हा पुन्हा आरोपींनी त्यांचा प्लॅन बदलला.
अपहरणाची रक्कम घेतल्यानंतर घेतल्यानंतर अपहरणकर्त्यांनी एरेकला बीकेसीमध्ये सोडून दिलं. एकदा मुलगा घरी परतल्यानंतर सुरुवातीपासून अपहरणकर्त्यांचा फोन ट्रॅक करत असलेल्या पोलिसांनी अखेर ४ अपहरणकर्त्यांना अटक केली.
First Published: Friday, January 27, 2012, 23:34