बंडखोरीचा धसका, शिवसेनेची नवी खेळी - Marathi News 24taas.com

बंडखोरीचा धसका, शिवसेनेची नवी खेळी

www.24taas.com, मुंबई
 
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी बंडखोरीचा धसका घेतलाय. त्यामुळे शिवसेनेने यासाठी एक नवी शक्कल लढवलीय. शिवसेना उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप करणार आहे.
 
शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांमार्फत आज आणि उद्या या दोन दिवसांत या फॉर्मचे वाटप करण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाली असली तरी AB फॉर्मचे वाटप झाल्यानंतरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे बोललं जातंय. निवडणुकांची रणधुमाळी आता सुरु झालीय. काही वॉर्ड राखीव झाल्याने आणि काही वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी शिवसेनेने हा फंडा अवलंबला आहे.
 
दरम्यान, पालिका निवडणुकीत उमेदवारांकडून  बंडखोरी होवू नये तसेच बंडखोरी टाळण्यासाठी राज ठाकरेंनी आटापिटा केल्याचे मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिसून आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरेंनी उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची आणि त्यांच्या घरच्यांची माफी मागून भावनिक आवाहन केले. तसेच मनसेने आपले उमेदवार जाहीर न केल्याने शिवसेनेने आपले उमेदवारही जाहीर केलेले नाही. मात्र, उमेदवार जाहीर केले तर बंडखोरी उफाळण्याची शक्यता घेत सेनेने सावध पवित्रा घेतला आहे.

First Published: Saturday, January 28, 2012, 16:00


comments powered by Disqus