रात्रीची गुन्हेगारी रोखणार 'पोलीस मित्र' - Marathi News 24taas.com

रात्रीची गुन्हेगारी रोखणार 'पोलीस मित्र'


www.24taas.com, मुंबई
 
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता 'पोलीस मित्र' असं नवं पथक तयार केलं आहे. यात कॉलेज विद्यार्थी आणि स्थानिकांचा समावेश करण्यात आला आहे.
 
हे पथक विशेषत: रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांवर नजर ठेवणार आहे. या पथकाच्या कामाला ‘अँटॉप हिल’ परिसरातून सुरुवात करण्यात आली असून जवळपास १४० जणांची फौज तयार करण्यात आली आहे. हे पथक रात्रभर गस्त घालणार असून पोलीस जवानही पथकाबरोबर असणार आहे.
 
मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून तयार झालेल्या या पथकात कॉलेज युवकांचा अधिक समावेश आहे.

First Published: Saturday, January 28, 2012, 17:37


comments powered by Disqus