अडसूळांचा टाइम्सविरोधात १०० कोटींचा दावा ! - Marathi News 24taas.com

अडसूळांचा टाइम्सविरोधात १०० कोटींचा दावा !

www.24taas.com, मुंबई
 
महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसच्या झालेल्या तोडफोडीचं खासदार आनंद अडसूळ यांनी समर्थन केलं आहे. इतकंच नव्हे, तर टाइम्सविरुद्ध  रुपये १०० कोटींचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
 
आज महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादीच्या गळाला लागले असल्याची बातमी छापण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी तोडफोड केली. दरम्यान तोडफोड प्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
जवळपास दोनशे ते अडीचशे शिवसैनिकांनी मटाच्या ऑफिसमध्ये आज सकाळच्या सुमारास ऑफिसमध्ये घुसले आणि तिथे मोठ्याप्रमाणात धिंगाणा घालत तोडफोड केली. महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक सारंग दर्शने यांनी या तोडफोडीचा निषेध केला आहे. तर याप्रकरणी १६ जणांवर एफआयआर दाखल केले असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सहआयुक्त रजनीश सेठ यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादीच्या गळाला लागले असल्याची बातमी छापण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.

First Published: Saturday, January 28, 2012, 19:04


comments powered by Disqus