श्री. नारायण राणे - गेस्ट एडिटर, झी २४ तास - Marathi News 24taas.com

श्री. नारायण राणे - गेस्ट एडिटर, झी २४ तास

www.24taas.com, न्यूजरूम मुंबई
 
आक्रमक नेते, उद्योगमंत्री नारायण राणे हे आजचे यांचे  झी २४ तासचे गेस्ट एडिटर म्हणून झी २४ तासच्या कार्यालयात आगमन झाले.  नारायण राणे आज झी २४ तासच्या गेस्ट एडिटर पदाचा पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून झी २४ तासच्या बातम्यांचा प्रवास आपणास पाहता येईल. गेस्ट एडिटर म्हणून दाखल झालेल्या नारायण राणे यांनी झी २४ तासच्या न्यूजरूममधील सर्व विभागांची माहिती घेतली. पत्रकांरावरील हल्ला, किंवा मनपा निवडणुकीबांबत संपादकीय मतं त्यांनी मांडली.
 
एरवी बातमी देणारे राणे गेस्ट एडिटरच्या भूमिकेत होते. त्यामुळे राणेंच्या बातमीलाही त्यांनी संपादकीय भूमिकेतूनच पाहिलं. मग ती बातमी सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जाहीर वस्त्रहरण करण्याच्या इशाऱ्याचे राणेंच्या असो किंवा कोकण पॅकेज फसवं असल्याच्या रामदास कदम यांच्या आरोपांचे असो. नीतेश राणेंची स्वाभिमान संघटनेच्या मनपा निव़डणुकीत उतरणार का ? या बातमीवरही त्यांनी आपलं संपादकीय मत मांडलं.
 
एका चित्रपटात राष्ट्रवादीचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली आहे. मुख्यमंत्री आव्हाडांवरही राणेंनी संपादकीय नजरेतून भाष्य केलं. उमेदवारी याद्यांची प्रतिक्षा, इच्छुंकांची घालमेल याबाबतची बातमी कशी द्यायला हवी. हेदेखील त्यांनी संपादकीय भूमिकेतून सांगितलं. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा असो की टीम इंडियाचा पराभवाचा. या सगळ्या बातम्यांवर राणेंनी गेस्ट एडिटर म्हणून भूमिका मांडली. त्यानंतर दिवसभरातील एकूणच बातम्या कोणत्या पद्धतीने जाणार याचा आढावा देखील गेस्ट एडिटर  नारायण राणे यांनी घेतला आहे. यानंतर ते येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
 
 
 

First Published: Sunday, January 29, 2012, 09:30


comments powered by Disqus