जेएनपीटी बंदरातून चोरी, तिघांनी कोठडी - Marathi News 24taas.com

जेएनपीटी बंदरातून चोरी, तिघांनी कोठडी

झी २४ तास वेब टीम, उरण 
 
मुंबई जवळील जेएनपीटी  (जवाहर नेहरु पोर्ट ) बंदरातून नेदरलँडला निर्यात करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या केमिकल ड्रम्सपैकी सुमारे ५० लाख रुपये किंमतीचे चोरीला गेलेले ड्रम्स परत मिळवण्यात पोलीसांना यश आलंय.
 
टसकॉन ट्रान्सपोर्ट या कंपनीमार्फत २० सप्टेंबर २०१११ रोजी वापीहून निघालेले केमीकल कंटेनर उरणला उशिरा पोहचल्यामुळे संशय निर्माण झाला होता. यावेळी एका कन्टेनरचं सील तोडल्याच्या संशयावरुन कंपनी व्यवस्थापनानं उरण येथील शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
 
पोलीसांच्या तपासात ८० ड्रम्सपैकी ४५  ड्रम्स चोरी झाल्याचं निष्पन्न झालं होतं. याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना ५ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर इतर ३ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

First Published: Thursday, October 27, 2011, 06:42


comments powered by Disqus