Last Updated: Thursday, October 27, 2011, 11:25
झी २४ तास वेब टीम, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे दिवाळी भेटी निमित्त झी २४ तासच्या कार्यालयात आगमन झाले. राज ठाकरेंच्या भेटीने कार्यालयातील नूरच पालटून गेला.
झी २४ तासच्या कर्मचारी वृदांमध्ये राज ठाकरेंच्या भेटीने उत्साहाचे आणि उल्हासाचे वातावरण तयार झाले. राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी संपादक मंदार परब यांच्या केबिन बाहेर एकच गर्दी उसळली आणि फोटो काढण्यासाठी चढाओढ सुरु झाली. राज ठाकरेंना झी २४ तासच्या सर्व विभागांना भेट देण्याचे आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची विनंती करण्यात आली आणि त्यांना तीचा आनंदाने स्वीकार केला. राज ठाकरेंशी थेट संवाद साधता येणार असल्याने आमच्या सहकाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.....
First Published: Thursday, October 27, 2011, 11:25