Last Updated: Tuesday, January 31, 2012, 21:01
पंकज दळवी, www.24taas.com ,मुंबई निवडणुकीसाठी वाट्टेल ते असंच चित्र घाटकोपरमध्ये पहायला मिळालं आहे. मनसे आमदार राम कदम यांच्या विभागातील मनसेचे सहा उमेदवार निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी वाजतगाजत निघाले .
याच बरोबर लोकांना आकर्षित करण्यासाठी आमदार राम कदम यांनी एक शक्कल लढवली. गिनिज बुकात नोंद घेतलेली जगातील सर्वात छोटी स्त्री ज्योती आणि महाराष्ट्राचा खली या दोघांना या मिरवणुकीत सहभागी करण्यात आले.
राम कदम आपल्या विभागातील सहा उमेदवारांसोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार होते. मात्र या मिरवणुकीत आमदार राम कदम यांनी जगातील सर्वात छोटी स्त्री ज्योती आणि महाराष्ट्राचा खली या दोघांना या मिरवणुकीत सहभागी करून आपण जरा हटके असल्य़ाचं दाखवून दिलं. या दोघांच्या सहभागामुळे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतं होती.
First Published: Tuesday, January 31, 2012, 21:01