भाजपला बंडोबांचा झटका - Marathi News 24taas.com

भाजपला बंडोबांचा झटका

www.24taas.com, मुंबई
 
‘पार्टी विथ डिफरन्स’ हे ब्रीद मिरविणाऱ्या भाजपलाही महापालिकेच्या निवडणुकीत बंडोबांनी झटका दिला आहे. मुंबईतील पक्षाच्या कार्यालयासमोर नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.
 
भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्तेच नाराज आहेत नाही तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे सरचिटणीस पराग अळवणी यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. मुंबईच्या विलेपार्ले विभागातून पराग अळवणी यांच्या पत्नी ज्योती  अळवणी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
 
मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यांनीही बंडखोरीचं निशाण फडकवलं होतं. राज पुरोहित यांच्या सुनेनं अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नात्यागोत्यासाठी पक्षालाच आव्हान दिल्यामुळे इतर नाराजांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात असून य़ा बंडखोरांनी माघार घेतली नाही तर त्याचा फटका भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही.

First Published: Wednesday, February 1, 2012, 22:46


comments powered by Disqus