Last Updated: Saturday, October 29, 2011, 11:04
दीपाली गुप्ताझी २४ तास वेब टीम, मुंबईमुंबईत गोरेगावमध्ये बलात्कार करून खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्या घरामध्येच अल्पवयीन मुलीचा मृतदेह लपवला होता. शेजाऱ्यांना घटना कळताच त्यांनी आरोपीला बेदम मारहाण करुन पोलिसांच्या हवाली केलं.मुंबईच्या गोरेगावमधल्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर याठिकाणी तणावाचं वातावरण आहे. सानिका जुमन ही पाच वर्षांची मुलगी रोजच्यासारखी घराबाहेर खेळत होती. मात्र, ती खेळत असल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या ५० वर्षांच्या बाबासाहेब कांबळेनं तिला आमिष दाखवून बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. या नराधमानं या मुलीला सिगरेटचे चटकेही दिले आणि तिचा खून केला. सानिकाच्या कुटुंबाला तपासानंतर कांबळेच्या घरात या मुलीचा मृतदेह सापडला. या घृणास्पद कृत्याची माहिती मिळताच लोकांनी कांबळेला मारहाण केली. या घटनेमुळं संतापलेल्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्येही जोरदार हंगामा केला. बाबासाहेब कांबळेंवर याआधी अशा प्नकारचे गुन्हे केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं या नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
First Published: Saturday, October 29, 2011, 11:04