'वर्षा'वर पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा मोर्चा - Marathi News 24taas.com

'वर्षा'वर पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा मोर्चा

झी २४ तास वेब टीम, मुंबई
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढला आहे. पेण अर्बन बँकेच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केलेला आहे. त्यामुळं बँक डबघाईला आली. बँकेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्यानं ठेवीदार हवालदिल झालेत.
या प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठोस भूमिका घ्यावी या मागणीसाठी ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला आहे. या मोर्चाला पेणमधून सुरुवात झाली. आमदार धैर्य़शील पाटील आणि संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय. बुधवारी हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धडकणार आहे.

First Published: Sunday, October 30, 2011, 08:39


comments powered by Disqus