क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग - Marathi News 24taas.com

क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईच्या मनीष मार्केट आणि सारा सहारा मार्केटची आगीची घटना ताजी असताना क्रॉफर्ड मार्केटमध्ये मध्यरात्री आग लागली. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. फळ बाजारातल्या
एका गोडाऊनमध्ये आग लागली. बघताबघता आगीनं जवळपासच्या दहा गोडाऊनला वेढलं. या गोडाऊनमध्ये कपडे, कॉस्मेटीक, प्लॅस्टीकचे सामान होते. त्यामुळं आग वाढतच गेली.
 
सुरवातीला अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड
जात असल्याचं लक्षात येताच आणखी पाण्याचे सहा टॅंकर मागवण्यात आले. चार तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. या घटनेमागे कुणाचा तरी कारस्थान असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. व्यापा-यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
 

 

First Published: Sunday, February 5, 2012, 10:21


comments powered by Disqus