Last Updated: Monday, February 6, 2012, 08:58
www.24taas.com, मुंबई
पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकल स्लो ट्रॅकवरून चालवण्यात येत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत.
काल दिवसभर पश्चिम रेल्वेर जम्बो मेगा ब्लॉक असल्यामुळे सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळात वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. आज आठवड्याचा पहिला दिवस आणि लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना परत एकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
First Published: Monday, February 6, 2012, 08:58