Last Updated: Tuesday, November 1, 2011, 06:12
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीतर्फे भीमशक्तीसाठी २३ जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भीमशक्तीसाठी शिवसेना १६ तर भाजपा ७ जागा सोडण्यास तयार असल्याचं वृत्त आहे. आरपीआयकडून मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

सुरूवातीला भीमशक्तीला ६२ जागा देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली होती. त्यानंतर ४० जागांवर तडजोड करण्यास त्यांनी तयारी दर्शवली. जागावाटपाच्या मुद्यावर शिवसेना-भाजप आणि भीमशक्तीच्या प्राथमिक स्वरूपात दोन बैठका झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत ७०/३० चा फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेनं १५६ तर भाजपानं ७१ जागा लढवल्या होत्या. त्यात ८६ जागांवर शिवसेनेला तर २९ जागांवर भाजपाला यश मिळालं होतं.
मुंबई महानगरपालिकेचे पडघम आता वाजू लागले आहेत, त्यामुळे तर्कवितर्क काढण्यात प्रत्येक राजकीय पक्ष लागला आहे. महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवशक्ती व भीमशक्ती यांची झालेली युती यांने या निवडणूकीची समीकरणे बदलली आहेत.
First Published: Tuesday, November 1, 2011, 06:12