Last Updated: Tuesday, November 1, 2011, 08:23
झी २४ तास वेब टीम, मुंबईकाँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज मुंबईत साजरा होणा-या छटपूजा उत्सवासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतल्या उत्तर भारतीय नेत्यांनी छटपूजेची जोरदार तयारी केली आहे. विविध कार्यक्रम आयोजित करून शक्तिप्रदर्शन करण्याची संधी त्यांनी साधली आहे. त्यामुळे छटपूजेचा राजकीय उत्साह यावेळी अधिक आहे. या उत्सवाला कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. कारण, खासदार निरुपम यांच्या एका वादग्रस्त विधानाचं सावट या उत्सवावर आहे.
उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई बंद पाडू शकतात असं वक्तव्य करत निरुपम यांनी मराठी-परप्रांतीय वादाला पुन्हा फोडणी दिली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलीय
First Published: Tuesday, November 1, 2011, 08:23