Last Updated: Thursday, February 9, 2012, 13:19
www.24taas.com, मुंबई मुंबईत जुहू कोळीवाड्यात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास साधारण २२ वर्षांच्या या तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह मिळाला.
तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डागही दिसत होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगिलं आहे. हा मृतदेह पाण्यातून वाहत जुहूपर्यंत आल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे. पोस्टमार्टेमसाठी हा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सांताक्रूझ पोलिसांकडील नोंदीनुसार गेल्या वर्षभरात दोन मुली आणि चार मुलांचे मृतदेह अशा प्रकारे मिळाले आहेत. मुंबईतील सुरक्षेबद्दल यावरुन पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे
First Published: Thursday, February 9, 2012, 13:19