Last Updated: Friday, February 10, 2012, 15:55
www.24taas.com, मुंबई मुंबईतलं वांद्रे कुर्ला संकूल म्हणजे वांद्रे कुर्ला काँप्लेक्स अर्थात बीकेसी हा एक पॉश ऑफिसेसचा एरिया आहे. अनेक मोठया कंपन्यांची कार्यालयं इथं आहेत. पण या भागात निवासी इमारतींसाठी फारसे प्लॉट उपलब्ध नाहीत. त्यामुळे या भागात येणाऱ्यांना कार्यालयं गाठण्यासाठी प्रवास करावा लागतोच.
पण आता राज्य सरकारनं वांद्रे कुर्ला संकुलात निवासी इमारतींसाठी अधिक प्लॉट उपलब्ध करुन देण्याचे संकेत दिले आहेत. असं झालं तर बीकेसीत काम करणारे उच्चपदस्थ याच भागात घरं घेऊ शकतील. त्यामुळं अर्थातच त्यांना कार्यालय गाठण्यासाठी फार मोठा प्रवास करावा लागणार नाही.
बीकेसीत निवासी फ्लॉट जास्त प्रमाणात उपलब्ध झाले तर मुंबईतल्या रस्त्यावरच्या वाहनांची संख्याही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
First Published: Friday, February 10, 2012, 15:55