Last Updated: Friday, February 10, 2012, 17:20
www.24taas.com, मुंबई २००३ मध्ये मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भातील तीन आरोपींना आज मुंबई हायकोर्ट मृत्यूदंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हनीफ सय्यद अनीस आणि त्याची पत्नी फहमीदा सय्यद अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत.
या प्रकरणात अटकेत असलेल्या तीन आरोपींना पोटाअंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २५ ऑगस्ट २००३ मध्ये गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजारमध्ये दोन टॅक्सीमध्ये शक्तीशाली बॉम्ब ठेवून बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात ५२ लोकांचा बळी गेला होता. पाकिस्तानशी संबंध असलेल्या लष्कर ए तोयब्बानं प्रथमच एका कुटुंबाचा बॉम्बस्फोट कऱण्यासाठी वापर केला होता.
२००९ मध्ये न्यायमुर्ती ए.एम खानविलकर आणि पी डी कोडे यांच्या खंडपीठानं गेल्या वर्षी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. मात्र, आज या आरोपींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.
First Published: Friday, February 10, 2012, 17:20