Last Updated: Wednesday, February 15, 2012, 10:00
www.24taas.com, मुंबई मुंबईत मस्जिद बंदर परिसरात एका नव्वद वर्षीय वृद्धेची हत्या झाली. हिराबेन मेहता असं या मृत महिलेचं नाव आहे. काही अज्ञात लोकांनी धारदार शस्त्रानं या वृद्ध महिलेचा गळा चिरून हत्या केल्याचं उघड झालं.
मस्जिद बंदरमधल्या श्रद्धानंद सोसायटीत दोन मुलांसह हिराबेन मेहता राहत होत्या. तर त्यांचा तिसरा मुलगा नाशिकमध्ये राहातो. पोलिसांनी याप्रकरणी तीनही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
First Published: Wednesday, February 15, 2012, 10:00