अडवाणींची जनचेतना रॅली मुंबईत - Marathi News 24taas.com

अडवाणींची जनचेतना रॅली मुंबईत

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेली जनचेतना रॅली आज मुंबईत दाखल होत आहे. आज दुपारी ४
वाजता ऐरोलीतल्या टोल नाक्यावर या जनचेतना रॅलीचं आगमन होईल.
 
जनचेतना रॅली मुंबईत ३९किलोमिटरचा प्रवास करणार आहे. मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या या सभेला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थिती लावणार आहेत. मुंबईत रॅलीच्या या ३९ किलोमिटरच्या प्रवासत एकूण सात ठिकाणी ही यात्रा थाबेल या थांब्यांवर चौक सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास ३० ते ३५ ठिकाणी या रथ यात्रेचं स्वागत केलं जाणार आहे. तर ऐरोली पासून सुरु होणारी ही यात्रा बोरीवलीतल्या कोरा केंद्र मैदानापर्यंत जाणार आहे. त्यानंतर शनिवारी ही यात्रा ठाणे जिल्ह्यातून गुजरातकडे रवाना होईल.

First Published: Friday, November 4, 2011, 03:08


comments powered by Disqus