Last Updated: Sunday, February 19, 2012, 16:38
www.24taas.com, मुंबई किंगफिशर एअरलाईन्सच्या एका विचित्र निर्णयामुळे प्रवाशआंना बराच मनस्ताप सहन करावा लागला. किंगफिशरनं अचानक मुंबईतली 16 उड्डाणे रद्द केली आहेत त्याचबरोबर काही उड्डाणं उशिरानंही होत आहेत. इतकंच नाही तर आता पुढचे दहा दिवस तरी किंगफिशरचं कोणतंही विमान उड्डाण घेणार नाही.
मुंबई पाठोपाठ किंगफिशरनं कोलकाता, दिल्ली इथली उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत. किंगफिशरच्या अधिका-यांकडून याबाबत कोणतंही ठोस कारण दिल जात नसलं तरी आर्थिक अडचणींमुळे किंगफिशरनं हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर या निर्णयाची नागरी उड्डयण विभागाने चोकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रवाशांना मात्र या निर्णयाचा चांगलाच फटका बसला.
First Published: Sunday, February 19, 2012, 16:38