जे डे हत्याः महिला पत्रकाराविरोधात आरोपपत्र - Marathi News 24taas.com

जे डे हत्याः महिला पत्रकाराविरोधात आरोपपत्र

www.24taas.com, मुंबई
पत्रकार जे डे यांच्या हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी महिला पत्रकार जिग्ना व्होरा यांच्या विरोधात मंगळवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
 
मिड डे या वृत्तपत्रात अंडरवर्ल्ड संदर्भात रिपोर्टिंग करणाऱ्या जे डे यांची गेल्या वर्षी ११ जून रोजी हत्या करण्यात आली होती.
 
जिग्ना यांच्या विरोधात भारतीय दंड संहिताच्या अंतर्गत अनेक कलमांखाली आरोपपत्र दाखल केले. यात गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे, तसेच मोक्का आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत.
 
या संदर्भात मोक्का न्यायालयाने दखल घेत सर्व आरोपींची १२ मार्चपर्यंत कोठडी वाढविली आहे. जिग्ना ही या प्रकरणातील ११ वी आरोपी आहेत.

First Published: Tuesday, February 21, 2012, 15:17


comments powered by Disqus