राज ठाकरेंवरील गुन्हा रद्द, हायकोर्टाचा दिलासा - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंवरील गुन्हा रद्द, हायकोर्टाचा दिलासा

www.24taas.com, मुंबई
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विक्रोळीत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. २००८ मध्ये विक्रोळीतील एका सभेत समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते.
 
या प्रकरणात राज ठाकरे यांना अटकही करण्यात आली होती. या संदर्भात कोर्टाने निकाल देत राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला आहे.  विक्रोळीच्या सभेत राज ठाकरे यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत म्हटले होते की, त्यांनी जर अबू आझमी लाठ्या काठ्या वाटण्याच्या गोष्टी करेल तर मी मराठी तरूणांना तलवारी वाटेल.
 
राज ठाकरेंच्या वक्तव्याची दखल घेत मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. परंतु, अशा प्रकाराचा  गुन्हा दाखळ करताना राज सरकारची परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु, पोलिसांनी राज्य सरकारची पूर्वपरवानगी न घेतल्याने हे प्रकरण राज ठाकरे यांच्या पथ्यावर पडले. राज ठाकरे यांच्या वकिलांनी हाच मुद्दा उचलत या प्रकरणात हायकोर्टाला हे प्रकरण रद्द करण्याची विनंती केली.
 
योग्य पद्धतीने गुन्हा नोंदविण्यात आला नाही, असे सांगून कोर्टाने राज ठाकरे यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात आला.
 

 

First Published: Tuesday, February 21, 2012, 22:30


comments powered by Disqus