शिवसेना महिला उमेदवाराला झाली अटक - Marathi News 24taas.com

शिवसेना महिला उमेदवाराला झाली अटक

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक तीन मधल्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवार वृषाली बागवे यांना अटक करण्यात आली आहे. दहिसर इथल्या उपशाखाप्रमुख विनोद कांदे आणि युवासेना शाखाधिकारी वसंत पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे वृषाली बागवे या सहाय्यक पोलीस आयुक्त विजय बागवे यांच्या पत्नी आहेत.
 
निवडणुकीतल्या पराभवासाठी आपल्याच पक्षातल्या या दोन कार्यकर्त्यांना जबाबदार धरत वृषाली बागवे यांनी त्यांना आपल्या घरी बोलावले. मात्र घरी पोहचले असता मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास बागवे यांच्यासह दोन महिलांनी स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याचा आरोप या दोघांनी केला आहे. या मारहाणीत दोघांनाही डोक्याला जखमा झाल्या. त्यानंतर या घटनेबाबत दोघांनीही दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
 
त्यानंतर पोलिसांनी वृषाली बागवे यांच्यासह चव्हाण नावाच्या आणखी एका महिलेला अटक केली. आज या दोघींनाही बोरीवली कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान मारहाणीच्या घटनेच्या वेळी पोलीस सहआयुक्त विजय बागवे घरी नसल्याचं सांगण्यात येतं आहे.
 
 

First Published: Wednesday, February 22, 2012, 14:16


comments powered by Disqus