Last Updated: Thursday, February 23, 2012, 15:39
www.24taas.com, मुंबई 
मुंबईत तीन वर्षानंतर अखेर 'एनएसजी हब'चे उदघाटन होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते उदघाटन होईल. अंधेरीतील मरोळ भागात एनएसजीचा हब उभारण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याचं काम सुरु होतं. २६-११ दहशतवादी हल्ल्याच्यावेळी एनएसजी कमांडोंना मुंबईत पोचायला उशिर झाला होता.
भविष्यातही मुंबई शहराला दहशतवाद्यांपासून धोका असल्यानं एनएसजीचा बेस कॅम्प मुंबई शहरात असावा, अशी मागणी पुढे आली होती. मुंबई नेहमीच दहशीतीच्या सावटाखाली असते. दहशतवाद्याकडून कधीही हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एखाद्या वेळेस खूप मोठा हल्ला झाल्यास एनएसजी कंमांडो त्वरीत घटनास्थळी पोहचायला हवे यासाठीच हे हब उभारण्यात आलं आहे. पण तरीही २६/११ नंतर हे हब मिळण्यास तब्बल तीन वर्ष लागल्याने सरकारची उदासिन दिसून आली.
First Published: Thursday, February 23, 2012, 15:39