Last Updated: Sunday, February 26, 2012, 08:43
www.24taas.com, मुंबई 
मुंबईतल्या सांताक्रुज परिसरात तीन गुंडांनी गर्दीत एका व्यापाऱ्यावर हल्ला करुन त्याला लुटलं. महावीर पारेख असं जखमी झालेल्या व्यापाऱ्याचं नावं आहे. त्याच्या दोन्ही पायावर चाकूनं वार करून त्याच्याकडचे लाखो रुपये आणि दागिने घेऊन हे चोरटे एका रिक्षातून पसार झाले.
विशेष म्हणजे त्यांच्याकडं एक पिस्तूल होतं. त्याच्या धाकानं त्यांनी आसपासच्या जमावाला रोखलं त्यामुळं मदतीला कुणीही पुढं आलं नाही. या गुंडांनी एका रिक्षाचालकाला धाक दाखवून ते रिक्षातून गेले नंतर जवळ आल्यावर ते पळून गेले. रिक्षाचालकानं याबाबत तक्रार दाखल केली आहे. व्यापारी महावीर पारेख यांची प्रकृती सुधारते आहे.
गर्दीत अशी घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसचं सुरक्षेचा बोजवारा पुन्हा उडाला आहे हे देखील सिद्ध होते.
First Published: Sunday, February 26, 2012, 08:43