Last Updated: Tuesday, February 28, 2012, 14:12
www.24taas.com, मुंबई राज्यातील आयपीएस अधिकारी के.एल. बिष्णोईंच्या कायद्याच्या पदवीप्रकरणी सात वरिष्ठ आयपीएस अधिका-यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
या अधिका-यांमध्ये एटीएसप्रमुख राकेश मारिया, नवल बजाज, संजय सक्सेना, विश्वास नांगरे-पाटील, ब्रिजेश सिंग, पंकज गुप्ता, मोहन राठोड या आयपीएस अधिका-यांचा समावेश आहे. बिष्णोई हे १२ मार्च २००५ ला कायद्याच्या परीक्षेला बसले नव्हते. मात्र असं असतानाही त्यांच्या नावापुढे गुण देण्यात आले होते.
सिद्धार्थ लॉ कॉलेजच्या माजी उपप्राचार्य चित्रा साळुंखे यांनी ही बाब परीक्षक म्हणून तत्कालीन प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निदर्शनास आणून दिली होती. तीन महिन्यांत सीबीआयने या अधिका-यांविरुद्धचा चौकशी अहवाल सादर करावा असं कोर्टाने स्ष्ट केले आहे.
एलएल.बीची प्रात्यक्षिक परीक्षा न देताच आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त के. एल. बिश्नोई यांना त्या परीक्षेत उत्तीर्ण केले गेले . एटीएस प्रमुख राकेश मारिया यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणी तपासाचे खोटे अहवाल सादर केले. दरम्यान, या त्या परीक्षेच्या परीक्षक चित्रा अनंत साळुंखे यांनी केलेल्या आरोपांचा तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले
First Published: Tuesday, February 28, 2012, 14:12