वर्सोव्यात एकाला जीवंत जाळले - Marathi News 24taas.com

वर्सोव्यात एकाला जीवंत जाळले

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईतल्या वर्सोव्यात एकाला जीवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. वर्सोवामधील सुंदरवाडी इथं काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या घटनेत, रेहमत शाह यांचा जागीच मृत्यू झाला. आपापसांतील भांडणातून हा प्रकार झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 
तिथले स्थानिक लोक आणि रेहमत शाह यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेकदा वादाचे प्रकार घडले होते. त्यातून रेहमत शाह काल रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर, त्यांना जीवंत जाळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. रेहमत यांच्या नातेवाईकांनी मात्र या प्रकारामागे 'एन्थोनी' नावाचा स्थानिक गुंड असल्याचा आरोप केला आहे.

First Published: Tuesday, November 8, 2011, 05:32


comments powered by Disqus