Last Updated: Wednesday, February 29, 2012, 13:19
www.24taas.com, मुंबई 
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल झालेले कृपाशंकर सिंह सध्या मुंबईबाहेर असल्याची माहिती आहे. ते सध्या दिल्लीत डेरेदाखल असल्याची माहिती आहे. मात्र दुसरीकडं त्यांच्या कुटुंबीय़ांची मात्र चौकशी होणार असल्याचं पोलीस सुत्रांची माहिती आहे, कृपाशंकर सिंह यांना कुठलाही क्षणी अटक केले जाऊ शकत आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंह यामुळे अज्ञातवासात निघून गेले आहेत. मुंबईतील त्यांच्या तीनही घरी कृपाशंकर सिंह आणि त्यांचे कुंटुंबियांपैकी कोणीही मुंबईत नसल्याने अटकेमुळेच कृपाशंकर हे अज्ञातवासात गेल्याचे समजते.
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कृपाशंकर सिंह हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत.
कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आणि त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश गेल्याच आठवड्यात हायकोर्टानं दिले होते. त्याच सोबत त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकत असल्यानेच गेले दोन दिवस मुंबईत न राहता दिल्लीत निघून गेल्याचे समजते. पण ते दिल्लीतही नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
First Published: Wednesday, February 29, 2012, 13:19