Last Updated: Tuesday, November 8, 2011, 05:50
झी २४ तास वेब टीम, मुंबई राज्यातील शाळा १४ नोव्हेंबरऐवजी ११ नोव्हेंबरला सुरु करण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं जारी केलाय.
११ नोव्हेंबर हा दिवस देशात शिक्षण दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पत्र शाळेत वाचले जाणार आहे. त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आलाय. सध्या दिवाळीची सुटी सुरू असल्यानं शाळांपर्यंत हा अध्यादेश उशिरानं पोचल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.
दिवाळी सुट्टीपूर्वी हा अध्यादेश निघाला असता तर संभाव्य गोंधळ टळला असता, असं शाळा प्रशासनाची भावना आहे. शिक्षमंत्र्यांना मात्र ते मान्य नाही.
First Published: Tuesday, November 8, 2011, 05:50