मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Marathi News 24taas.com

मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

www.24taas.com, मुंबई
 
मनसेच्या दक्षिण मुंबईतल्या सहा विभागअध्यक्षांनी राजीनामे दिलेत. महापालिका निवडणुकीत संबंधित विभागात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत या सहा जणांनी राजीनामे दिले आहेत.
 
 
याआधीही बाळा नांदगावकरांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला होता. अरविंद गावडे, संजय नाईक, धनराज नाईक, शरीफ देशमुख, भुपेन जोशी, रवी चव्हाण या सहा जणांनी राजीनामे दिले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत आमदार बाळा नांदगावकर यांच्या मतदार संघात मनसेला यश मिळाले नाही. मात्र, दादरमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकत मनसेने शिवसेनाला जोरदार धक्का दिला. हा कित्ता नांदगावकर यांच्या शिवडी मतदार संघात होण्याची अपेक्षा होती. परंतु या ठिकाणी मनसे बॅकफुटवर गेली.
 
 
या सर्वबाबींची नैतिक जबाबदारी नांदगावकर यांनी स्वीकारली. त्यांनी आपल्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता पक्षाच्या शिवडी मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिल्याने हे राजीनामे मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वीकारता का, याकडे लक्ष लागले आहे.

First Published: Wednesday, February 29, 2012, 15:52


comments powered by Disqus