राष्ट्रवादीची वेगळ्या चुलीची भाषा - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादीची वेगळ्या चुलीची भाषा

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. ज्या ठिकाणी पक्ष मजबूत आहे. त्याठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
 
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करायची की स्वबळावर लढायचं. याचा निर्णय १० नोव्हेंबरला होणा-या बैठकीत ठरणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिका-यांची ही बैठक वांद्र्यातल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या सभागृहात पार पडली.
 
डिसेंबर महिन्यात होणा-या नगर परिषद निवडणुका आणि त्या नंतर होणा-या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारी संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असल्यानं मंत्र्यांच्या कामगिरीचाही यावेळी आढावा घेतला गेला.

First Published: Tuesday, November 8, 2011, 07:22


comments powered by Disqus