'कामा'ची सुरक्षा बिनकामाची, बाळाची चोरी - Marathi News 24taas.com

'कामा'ची सुरक्षा बिनकामाची, बाळाची चोरी

www.24taas.com,  मुंबई
 
 
मुंबईतील हॉस्पिटलमधून पुन्हा एकदा बाळाची चोरी झाली आहे. याआधीही अशी बाळाची चोरी झाली होती. दक्षिण मुंबईतील कामा आब्लेस हॉस्पिटलमधून सात महिन्यांचे मूल पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. यामुळे 'कामा'ची सुरक्षा बिनकामाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
चर्चगेट येथे राहणारी दुर्गा काळे ही महिला दुपारी हॉस्पिटलमध्ये आली होती . तिच्या मुलाच्या त्वचेला संसर्ग झाला होता . ओपीडीमध्ये एका वृद्धेने तिच्याशी गप्पा मारण्या सुरूवात केली. दुर्गाच्या काही नातेवाईकांची ओळखही सांगितली . तू रांगेत उभी राहून केस पेपर काढ , तोपर्यंत मी मुलाला सांभाळते , असे त्या वृद्धेने दुर्गाला सांगितले . तिचा विश्वास वाटल्याने दुर्गानेही तिच्याकडे मूल सोपवले . ती केस पेपर काढून येईपर्यंत महिला गायब असल्याचे लक्षात आले. यामुळे  हॉस्पिटल परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
 
 
संशयित वृद्धेने लाल रंगाची साडी परीधान केली  होती , अशी माहिती दुर्गाची बहीण मालन हिने पोलिसांना दिली . रात्री उशिरापर्यंत मुलाचा तपास लागला नसल्याचे एसीपी शशिकांत सातव यांनी सांगितले . दरम्यान, मूल चोरणार्‍या वृद्धेला रुग्णालयातील कोणी कर्मचाऱ्यांनी पाहिले आहे का, हे आझाद मैदान पोलीस पडताळून पाहात आहेत. सोबत दुर्गाच्या माहितीवरून संशयित वृद्धेचे रेखाचित्रही तयार केले जात आहे.
 
दरम्यान, मुल चोरी झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचे पोलिसांनी सांगितले . यामुळे 'कामा'ची सुरक्षा बिनकामाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलिसांनी  तक्रार दाखल झाल्यानंतर वोलिसांनी मुलाच्याच काकाला मानखुर्द येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

First Published: Thursday, March 1, 2012, 10:45


comments powered by Disqus