Last Updated: Thursday, March 1, 2012, 17:59
www.24taas.com, मुंबई 
मुंबईत १६ एप्रिलपासून रिक्षा युनियनने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. भाडेवाढीची मागणी मान्य न झाल्यास संपाचे हत्यार उपसावे लागेल असं युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी म्हटलं आहे.
आज मंत्रालयात होणारी भाडेवाढी संदर्भातली बैठक पुढे ढकलण्यात आल्यानंतर राव आक्रमक झाले आहेत. रिक्षाचे किमान भाडे १७ ते २० रुपयांदरम्यान असावं अशी युनियनची मागणी आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असतानाच इलेक्टॉनिक मीटर सक्तीविरोधात नागपुरातल्या रिक्षा चालकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय. सरकारनं इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती केलीय. सरकारच्या या निर्णयाविरोधात ऑटोचालक संघटनेने हा संप पुकारलाय. संपाच्या या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र ऑटो चालकांच्या या संपामुळे दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना फटका बसलाय.
संपामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशिर झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. शिवाय इतर शाळकरी विद्यार्थ्यांनाही शाळेत वेळेवर पोहचण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
First Published: Thursday, March 1, 2012, 17:59