Last Updated: Sunday, March 4, 2012, 09:43
www.24taas.com, मुंबई 
मुंबईच्या कामा हॉस्पीटलमधून चार दिवसांपूर्वी चोरीस गेलेलं मुलं सापडलंय. टॅक्सीतून आलेल्या एका अनोळखी महिलेनं शनिवारी सकाळी मुंबईतल्या एका दर्ग्यासमोर या मुलाला गुपचूप ठेवून ही महिला पसार झाली. आता पोलीस या महिलेचा तसंच टॅक्सीचा शोध घेत आहेत.
दुर्गा ही महिला 29 फेब्रूवारी रोजी आपल्या 7 महिन्यांच्या मुलाला उपचारासाठी घेऊन कामा हॉस्पीटलमध्ये आली होती. बराच वेळ थांबूनही आपला नंबर येत नसल्यानं दुर्गा हिनं आपलं बाळ तिथं उभ्या असणा-या एका महिलेच्या हाती सोपवून डॉक्टरांकडं गेली होती. परंतु जेव्हा ती परत आली तेव्हा ती महिला तिच्या बाळाला घेऊन पसार झाली होती. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांत गुन्हा नोंद कऱण्यात आला होता. मुलाला चोरून नेणा-या महिलेनं आपण सापडण्याच्या भितीनचं मुलं सोडून दिल्याचं पोलीस सांगत आहेत.
First Published: Sunday, March 4, 2012, 09:43