ये कैसा तरीका है? कृपांचा मीडियाला सवाल - Marathi News 24taas.com

ये कैसा तरीका है? कृपांचा मीडियाला सवाल

www.24taas.com, मुंबई


 


बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटकेची टांगती तलवार असली तरी कृपाशंकर सिंह यांची मग्रुरी कायम आहे. तसंच कृपाशंकर सिंह यांच्या सहकाऱ्यांचाही माज कमी झालेला नाही.


 


कृपाशंकर सिंह यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनी याचा अनुभव घेतला. पत्रकारांनाच नैतिकतेचा पाठ शिकवण्याची त्यांची खुमखुमी मुंबईतल्या रस्त्यावर दिसून आली. जेव्हा झी २४ तासच्या पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारला तेव्हा ते पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करू लागले.


 


ये कैसा तरीका है ? असा उलट सवालच कृपाशंकर सिंह यांनी पत्रकारांना विचारला. त्यामुळे कृपाशंकर यांची मग्रुरी मात्र कायम आहे. तसचं दोन दिवसापूर्वी त्यांच्या मुलाने मिडीयाकडे पाहून आक्षेपार्ह अंगुलीनिर्देश केले होते. त्यामुळे अडचणीत आलेले असले तरी मात्र त्यांचा तोरा कायम आहे.


 


 


 


First Published: Monday, March 5, 2012, 17:17


comments powered by Disqus