मुंबईच्या महापौरपदी कोण? - Marathi News 24taas.com

मुंबईच्या महापौरपदी कोण?

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेतून कोणाचा महापौर होणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे. महापौरपदासाठी शिवसेनेचे सुनील प्रभू, राहुल शेवाळे आणि विद्यमान महापौर श्रद्धा जाधव यांच्यात चुरस आहे. या तिघांपैकी कुणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकावी याबाबत उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला आहे.
 
त्यातच महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्य़ांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आलीये. सुनील प्रभू यांची नगरसेवकपदाची पाचवी टर्म आहे. तर राहुल शेवाळे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. मातोश्रीच्या गुडबुकमध्ये त्यांचं नाव सर्वात वरच्या रांगेत आहे. तर विद्यमान महापौर श्रध्दा जाधव याही पुन्हा महापौरपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता यावरचा सस्पेंस मात्र संपणार आहे.

First Published: Monday, March 5, 2012, 11:17


comments powered by Disqus