मुंबईचे नवे महापौर सेनेचे सुनील प्रभू! - Marathi News 24taas.com

मुंबईचे नवे महापौर सेनेचे सुनील प्रभू!

www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या महापौरपदासाठी सुनील प्रभू, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी  राहुल शेवाळे तर गटनेतेपदासाठी यशोधन फणसे यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं. या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही.
 
मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुनील प्रभु की राहुल शेवाळे या दोन नावांमधून सुनील प्रभु यांचे नाव निश्चित करण्यात आले. सुनील प्रभु यांच्य नगरसेवक म्हणून चार वेळा निवडून आले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.
 
दरम्यान, सुनील प्रभु आणि राहुल शेवाळे मातोश्रीहून महापालिका मुख्यालयात जाणार आणि त्या ठिकाणी सुनील प्रभु महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
 
 
सुनील प्रभू हे सलग चार वेळा महापालिकेवर निवडून आले आहेत तर सुरेंद्र बागलकरांची ही दुसरी टर्म आहे. सुनील प्रभू यांची ओळख एक अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम नगरसेवक अशी आहे. तर, राहुल  शेवाळे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलं आहे. राहुल शेवाळे हे तीन वेळा महापालिकेवर निवडून आले आहेत.
 

First Published: Monday, March 5, 2012, 15:34


comments powered by Disqus