कन्हैयालाल गिडवानीसह चौघांना अटक - Marathi News 24taas.com

कन्हैयालाल गिडवानीसह चौघांना अटक

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोपातून मुक्तता करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि दोन वकीलांना सीबीआयने अटक केली आहे.
 
 
आदर्श घोटाळ्यातील आपल्यावरील आरोप सौम्य करण्यासाठी गिडवाणी यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांची लाच दिल्याची धक्कादायक माहिती सीबीआयला याप्रकरणाच्या तपासात मिळाली आहे. गिडवाणी पिता पुत्रांबरोबर सीबीआयचे वकील मंदार गोस्वामी आणि जे. के. जिग्यासी यांना सीबीआयने याप्रकरणी अटक केली.  आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणात अडकलेले गिडवाणी या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आहेत. आदर्श सोसायटीच्या निर्मितीपासूनच गिडवाणी या सोसायटीचे प्रमुक सदस्य होते.  जिग्यासी वकीलामार्फत २१ लाख रूपये दिले होते.
 
 
दरम्यान,  मुंबईतील वादग्रस्त आदर्श बिल्डिंग पाडण्याच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय लांबणीवर पडला. आदर्श सोसायटीचं म्हणणं ऐकून न घेताच हा निर्णय झाल्यानं अतिरीक्त सॉलीसिटर जनरल खंबाटा यांनी आक्षेप घेतला. तर दुसरीकडे आदर्शप्रकरणी विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांचा काही संबध आहे काय याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी एका सामाजिक कार्यकर्त्याने केली. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली होती. आता लाचप्रकणी चौघांना अटक करण्यात आल्याने नवे गौलबंगाल पुढे आले आहे.


 
 
बहुचर्चित आदर्श घोटाळा प्रकरण सध्या एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपल आहे. या प्रकरणात विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांचा काही संबंध आहे काय याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी प्रवीण वाटेगावकर यांनी केली. याबाबत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. तसंच फ्लॅट खरेदी करताना ब्लॅक मनीचा वापर झाला आहे काय याचीही चौकशी करा अशी मागणी वाटेगावकर यांनी केली होती.
 

First Published: Wednesday, March 7, 2012, 16:55


comments powered by Disqus