संपावर बस, पालक-विद्यार्थी 'बे'-बस - Marathi News 24taas.com

संपावर बस, पालक-विद्यार्थी 'बे'-बस

www.24taas.com, मुंबई
 
राज्यभरातील बस मालक ९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातल्या बसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यात आहे. बस मालक संघटनेच्या सदस्यांना मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली.
 
सरकार बसमालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संघटनेने बेमुदत इशारा दिला आहे. आता ऐन परीक्षेच्या काळात मुंबईसहा राज्यातल्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची चांगलीच अडचण त्यामुळे होणार आहे. मुंबईत सुमारे तीन हजार बसेस विदयार्थ्यांना ने-आण करतात. मुंबईत दररोज चार लाख विद्यार्थी बसने प्रवास करतात. सरकारने वेळीच लक्ष दिलं नाही तर कठिण परिस्थिती उदभवणार आहे.

First Published: Wednesday, March 7, 2012, 16:54


comments powered by Disqus